शिवसेना शहरप्रमुख रोहित भोगटे यांनी व्यक्त केला विश्वास
कुडाळ : महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना कुडाळ शहरातून मोठे मताधिक्य देणार असा विश्वास शिवसेना शहरप्रमुख रोहित भोगटे यांनी व्यक्त केला आहे.
निलेश राणे यांनी कुडाळमध्ये प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना शहरप्रमुख रोहित भोगटे स्वतः पुढाकार घेऊन राणे यांचे विचार घरघरात पोहोचवत आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.