कुडाळमधील ३३४ मतदान यंत्र आणि ३६२ व्हिव्हिपॅटचे सिलिंग पूर्ण

मतदान यंत्र सिलिंग प्रक्रिया शांततेत

निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांचे मार्गदर्शन

कुडाळ : कुडाळ तहसील कार्यालयातील मधल्या मोकळ्या जागेत निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ विधानसभा मतदारसंघातील २७९ केंद्रांच्या ३३४ मतदान यंत्र आणि ३६२ व्हिव्हिपॅट सिलिंग कार्यक्रम सोमवारी सकाळी १० वा. पासून शांततेत सुरू झाला.मंगळवारी दुपारी या कार्यक्रमाची सांगता झाली.,     भारत निवडणूक आयोग, दिल्ली यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. २६९ कुडाळ विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रक्रियेनुसार सोमवारी मतदान यंत्र सिलिंग कार्यक्रम सुरू झाला. कुडाळ विधानसभा मतदारसंघातील २७९ केंद्रामधील ३३४ मशीन १४ राउंड मध्ये सिलिंग करण्यात आल्या. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी वर्षा झाल्टे व वीरसिंग वसावे आदी सह पक्षाचे प्रतिनिधी, उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

error: Content is protected !!