श्री. देव रवळनाथ मंदिर निरुखे वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

कुडाळ : श्री. देव रवळनाथ मंदिर निरुखेचा वर्धापन दिन सोहळा सोमवार दिनांक ५ मे २०२५ रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त दिनांक ५ आणि ६ मे रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वैशाख शु. अष्टमी सोमवार दि ०५ मे, २०२५

सका. ०८ ते १२.०० वा. आदिशक्ति त्रिगुणात्मिक परमेश्वरीला कुंकुमार्चन पूजा

संध्या ०७ वा. हरिपाठ

रात्रौ ०८ वा. ग्रामस्थांची भजने

वैशाख शु. नवमी मंगळवार दि. ०६ मे २०२५

सका. ७.३० ते ११.३० वा. शिवशक्तिअर्चना, पुण्याहवाचन, संभारदान, लघुरुद्र, देवता आवाहन, होमहवनादी, सत्यनारायण महापुजा

सका. 11.40 वा. महाआरती

दुपा. १२.१५ वा. पालखी प्रदक्षिणा, तीर्थप्रसाद, महाप्रसाद

संध्या. ०७ वा. ‘ग्रामस्थ हरिपाठ

रात्रौ १०.३० वा. महान पौराणिक नाटक श्री बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळ

तेव्हा सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन अष्टप्रधान मंडळ, देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती, श्री. देव रवळनाथ सेवा मंडळ मुंबई व निरुखे ग्रामस्थ यांनी केले आहे.

error: Content is protected !!