अतिशय चुकीची बातमी, नितेश आणि मी एका घरात राहतो म्हणून भावाला फोन करायची गरज काय अशी प्रतिक्रिया आ. नितेश राणे यांनी X पोस्टच्या माध्यमातून केली आहे. जी सध्या कोकणात चर्चेचा विषय ठरली आहे.
कुडाळ येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार दौऱ्यात केलेल्या भाषणात निलेश राणे यांनी म्हटले होते की, सरकारमध्ये मला जर कोणाची मदत हवी असेल तर कोणालाही फोन लावत नाही फक्त एकाच व्यक्तीला फोन लावतो ती म्हणजे उदय सामंत. याबाबत महाराष्टातील एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने वृत्त प्रसारित केले होते. नितेश नव्हे, सरकारमध्ये ‘यांना ‘ निलेश राणे करतात पहिला कॉल असे शीर्षक त्या बातमीला देण्यात आले. या बातमी वर केलेली निलेश राणेंची X पोस्ट सध्या कोकणात चर्चेचा विषय ठरली आहे.
चुकीची बातमी, नितेश आणि मी एका घरात राहतो म्हणून भावाला फोन करायची गरज काय, आम्ही रोज भेटतो एक दुसऱ्याला. आयुष्यभर काही पत्रकारांनी दोन भावांमध्ये आणि परिवारामध्ये भांडण लावायचाच प्रयत्न केला. अशी प्रतिक्रिया त्यांनी X पोस्टच्या माध्यमातून केली आहे. जी सध्या संपूर्ण कोकणात चर्चेचा विषय ठरली आहे.