बंद घरात आढळला तरुणाचा मृतदेह

सावंतवाडी: माठेवाडा येथील एका घरातील बंद खोलीत मासे विक्रेते शैलेश विलास तारी (४५) यांचा मृतदेह आढळून आला. बंद दरवाजा फोडून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविला. पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक, पोलीस हवालदार गुरूदास नाईक, पवन परब आणि महेश जाधव यांनी घटनेचा पंचनामा केला. मृतदेहाला दोन दिवस झाल्याचा अंदाज आहे. तारी हे मूळ शिरोडा येथील आहेत.

error: Content is protected !!