साळगाव मर्यादित रंगभरण, चित्रकला, रांगोळी स्पर्धा

कुडाळ : जि. प. पूर्ण. प्रा. शाळा साळगाव क्र. 1 च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सव वर्ष च्या निमित्ताने शतकोत्तर सुवर्णमहोत्सव समिती आणि साळगाव मित्रमंडळ यांच्या मार्फत रंगउधळण 2025 आयोजित केले आहे. साळगाव मधील मुलांच्या कलेला वाव देण्यासाठी आणि या भावी कलाकारांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने “रंगउधळण 2025” या अंतर्गत रंगभरण, चित्रकला आणि रांगोळी अशा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. रविवार 27 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8 ते 12 या कालावधी मध्ये या स्पर्धा होतील. अंगणवाडी ते पहिली, दुसरी ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी असे चार गट असतील.
स्पर्धा संपन्न झाल्यावर लगेच दुपारी पारितोषिक वितरण होईल. सहभागी सर्व स्पर्धकांना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल. प्रत्येक गटातील विजेत्या स्पर्धकांना चषक देऊन सन्मानित करण्यात येईल.

error: Content is protected !!