कुडाळ : गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत कुंभारवाडी प्रशालेची विद्यार्थिनी कु. एकता अरविंद करलकर हिने महाराष्ट्र राज्यात पाचवा क्रमांक पटकावला आहे. तिला एकूण १०० पैकी ९२ गुण मिळाले आहेत.
या परीक्षेसाठी तिला शिक्षिका ऋतुजा गावडे, अरुणा गोठोसकर, मुख्याध्यापक स्वप्नाली सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.