रत्नागिरी : दैनिक नवराष्ट्र आयोजित रत्नागिरी – सिंधुदुर्ग सन्मान सोहळा २०२५ चे आयोजन रत्नागिरी येथे करण्यात आले होते. यावेळी रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.
यावेळी कुडाळ तालुक्यातील निरुखे गावचे सरपंच कीर्तिकुमार तेरसे यांना आदर्श सरपंच म्हणून सन्मानित करण्यात आले. उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन हा सन्मान करण्यात आला.