आमदार नितेश राणेंच वक्तव्य महायुतीत कुणी गांभीर्याने घेत नाही

माजी आमदार परशुराम उपरकर यांची टीका

आमदार नितेश राणे हे सातत्याने प्रसिद्धीसाठी वाटेल ती वक्तव्य करत आहेत. त्यांची वक्तव्य महायुतीमध्येही कोणी गांभीर्याने घेत नाही. मशीदीवरील भोंगे उतरवण्याचे त्यांचे वक्तव्यही केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचे महायुतीच्या नेत्यांनी स्पष्ट केल्याने यांचे पितळ उघडे पडले असल्याची टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.
आमदार नितेश राणे हे स्वतः हिंदूंचे गब्बर असल्याचे सांगत फिरत आहेत. केवळ प्रसिद्धीसाठीचा त्यांचा हा खटाटोप सुरू आहे. वाटेल ती वक्तव्य करायची आणि प्रसिद्ध मिळवायची या पलीकडे ते कोणतेही काम करत नाहीत. मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबतच्या त्यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी समाचार घेतला आहे. महायुतीचे काम संविधानावर चालते संविधान सेक्युलर आहे. नितेश राणे यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नसल्याचे त्याने स्पष्ट केले. तर शिंदे शिवसेनेचे भरत गोगावले यांनीही भोंगे उतरविण्याचा निर्णय असता तर तो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी घेतला असता. आमदार नितेश राणे हे चुकीचे वक्तव्य करत आहेत. त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवू नये असे स्पष्ट केले आहे. महायुतीचे नेते नितेश राणे यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवू नये असे म्हणत असल्याने आता जनतेने ठरविण्याची गरज आहे. त्यांचेच नेते विश्वास ठेवू नका असे सांगत असतील तर जनतेने ही अशा आमदारावर विश्वास न ठेवता महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांना मतदान करावे असे आवाहनही श्री. उपरकर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *