दोडामार्ग :- अखील भारतीय मराठा महासंघ, दोडामार्ग च्या वतीने रवीवार दि. 13/04/2025 रोजी महाराजा हॉल, दोडामार्ग येथे अॅडव्हानटेज दोडामार्ग ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी पर्यावरण कायदेवीषक तज्ञ अॅड. उमा सावंत यांनी पर्यावरण व बांधकाम नीयमावली ” या विषयावर मार्गदर्शन केले.
या विषयावर बोलताना त्यांनी सांगीतले की, सध्याची बांधकाम नियमावली ही सर्व समावेशक नाही. या बांधकाम नियमावली मध्ये स्थानीक भौगोलीक स्थीतीचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र हा विवीधतने नटलेला प्रदेश आहे. पश्चीम घाटा मधील भौगोलीक संरचना व दख्खनच्य पठारावरील भुप्रदेश रचना यात फरक आहे. कोकणातील माती ही रेताड आहे. सदर भुमीला अनुकूल अशी बांधकाम नियमावली करणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्हामध्ये मोठया प्रमाणे टाऊनशीप प्रोजेक्ट होऊ घातलेले आहे. अश्या प्रोजेक्टना विरोध करण्याची गरज नाही. मात्र अश्या प्रोजेक्टनां स्थानीक भौगोलीक परीस्थीतीचा विचार करून मंजूरी देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात सध्या प्रचलीत असलेल्या कायदयाचे आधारे मुक्त हस्ताने परवानगी दिल्यास सिंधुदुर्गात सुध्दा वायनाड, उत्तराखंड व माळीण प्रमाणे भुस्खःलन होऊन मोठ्या प्रमाणात वित्त व मानवी जीवनाची हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. युरोपीयन देश नेदरलँड, इंग्लंड तसेच सिंगापूर च्या बांधकाम नियमावली प्रमाणे आपल्या बांधकाम नियमावलीमध्ये बदल करण्याची गरज. या देशांच्या कायद्यानुसार कोणताही टाऊन शीप प्रोजेक्ट मंजूर करण्यापुर्वी ज्या गावात असे प्रोजेक्ट होणार आहेत त्या गावाची राहत्या घरांची गरज, एवढ्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मानवी वस्तीला पुरेसे पाणी पुरवण्याची क्षमता रस्ते वैद्यकीय सेवा सुवीधा देण्याची क्षमता आहे की याची तपासणी केली जाते व अश्या प्रोजेक्टनां क्षमता चाचणी दाखला देणे अनीवार्य आहे. आज महाराष्ट्रातील अनेक शहरांना त्यांच्या लगतच्या खेडेगावातील धरणांमधुन पाणी पुरवठा होत आहे. त्याचा फायदा खेड्यातील लोकांना होत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक टाऊन शीप प्रोजेक्टचे ग्रीन ऑडीट करण्याच्या दृष्टीने बांधकाम नीयमावलीत समावेश करण्याची गरज आहे. भारतात एकटया बांधकाम इंडस्ट्रीजचा कार्बन उस्तर्जनात 25 ते 30 टक्के वाटा आहे. अश्याप्रकारे जर टाऊन शीप प्रोजेक्ट पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून बांधल्यास ग्लोबल वार्मीगचा धोका वाढणारा आहे. सिंधुदर्गजिल्हात टाउनशीप प्रोजेक्ट प्रामुख्याने डोंगर उताराच्या जमीनीवर येत आहे. सदरची स्थाने स्थानीक वन्य जीवांचे वसतीस्थान आहे. अश्या स्थीतीत डोगर उतारावर टाऊन शीप प्रोजेक्ट व वन्य प्राण्याचे वसतीस्थान यांच्यात बफर झोन करणे गरजेचे आहे. जेणेकरून वन्य प्राणी हे मानवी वस्तीमध्ये येणार नाहीत. अन्यथा मानव व वन्य प्राणी यांचा संघर्ष अनीवार्य आहे. बांधकाम परवानग्य सरकारने आपल्या हातामध्ये केद्रीभुत केलेल्या आहेत. ग्रामपंचायत कायद्यातील बांधकाम परवानगीची तरतूद ही सध्या कागदावरच राहीलेली आहे. स्थानीक स्वराज्य संस्थाना भौगोलीक परीस्थीतीचे योग्य ज्ञान असते. कॅलीफोर्नीयाच्या कायद्याच्या धर्तीवर स्थानीक स्वराज्य संस्थेचे बांधकाम परवानगी देण्याचे अधीकार अधीक सक्षम करणे गरजेचे आहे.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मराठा महासंघाचे दोडामार्गचे अध्यक्ष उदय पास्ते, सचीव भुषण सावंत, खजीनदार संदीप घाडी, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सोनू गवस, उपाध्यक्ष दिवाकर गवस व इतर मराठा समाज कार्यकर्ते यांनी मेहनत केली. सुत्रसंचालन श्री. सुमीत दळवी यांनी केले.

Subscribe





