पाठीत खंजीर खुपसणाऱ्या पक्षाला सन्माननीय राज साहेबांचा महाराष्ट्र सैनिक कदापि मदत करणार नाही.

मंत्री दीपक केसरकर यांनी मनसेला गृहीत धरून गैरसमज पसरवू नयेत – कुणाल किनळेकर.

सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणुकीत सन्माननीय राज साहेबांनी दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याच्या बदल्यात विधानसभा निवडणुकीत सन्माननीय अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देऊन पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक कदापि मदत करणार नाही. अशी प्रतिक्रिया मनसे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी दिली आहे.

सावंतवाडी मतदारसंघात जनतेने तीन वेळा आमदारकीची संधी दिलेले दिपक केसरकर हे आपल्या सात वर्षाच्या मंत्री पदाच्या कार्यकाळात चष्म्याचा कारखाना, सेट टॉप बॉक्स कारखाना, मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल यासारख्या यांसारख्या अपूर्ण आश्वासनाखेरीज कोणतेही ठोस काम करू शकलेले नाही. याउलट परप्रांतीय मायनिंग व्यावसायिकांना मदत करताना स्वतः कोणते उद्योग आणू न शकलेल्या केसरकरांनी आरवली सागरतीर्थ येथिल नियमानुसार व्यवसाय करणाऱ्या स्थानिक जवळपास २००वाळू व्यवसायिक कुटुंबांना देशोधडीला लावून परप्रांतीय उद्योजकाला मदत ही यांची ओळख. मतदारसंघातील रोजगार आणि आरोग्य या महत्त्वाच्या प्रश्नांवर अपयशी ठरलेले हे आमदार राज ठाकरे यांना मानणारा मतदार व महाराष्ट्र सैनिक हे आपल्याकडे वळावे म्हणून अशाप्रकारची वक्तव्ये करत आहेत. तसेच यासंदर्भात वरिष्ठ स्तरावरून कोणतेही आदेश नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निवडणुकीत तटस्थ भूमिकेत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *