मधमाशांनी हल्ला केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

दोडामार्ग : मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे उपचारादरम्यान गोवा-बांबुळी येथे निधन झाले. रामदास गोविंद गवस (वय ४२, रा. मांगेली-तळेवाडी) असे त्याचे नाव आहे. तो आपल्या काजू बागेत काजू गोळा करण्यासाठी केला होता. त्यावेळी त्याच्यावर मधमाशांनी हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, भाऊ असा परिवार आहे.

error: Content is protected !!