कुडाळ : शहरातील आठवडा बाजार असतानाही बेदकारपणे डंपर चालवल्याप्रकरणी चार डंपर वर कुडाळ पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी चार डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चालक शुभम हर्षलाल तिवारी (३०, रा. साखळी गोवा), दावल नबीसाब शेख (५५, रा. चौके), गंगाराम उत्तम परब (४४) व रितेश लक्ष्मण मुळगावकर या चौघांवर गुन्हा दाखल करत कारवाई करण्यात आली. ही कारवाई अमोल बंडगर, ज्योती रायशिरोडकर, मेघश्याम भगत यांनी केली, ‘अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.