केवळ एक हत्ती पकडण्याच्या आदेशाचे पत्र म्हणजे ग्रामस्थांची निव्वळ फसवणूक – वैभव नाईक
दोडामार्ग:हत्तीच्या हल्ल्यात दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले येथील लक्ष्मण यशवंत गवस (वय- ६५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून आज माजी आमदार वैभव नाईक यांनी गवस कुटूंबियांची भेट घेऊन सांत्वन करत विचारपूस केली आणि गवस कुटुंबियांना धीर दिला. या घटनेनंतर हत्ती पकड मोहिमेच्या आदेशाचे पत्र प्रशासनाने मोर्ले ग्रामस्थांना दिले आहे. मात्र हि ग्रामस्थांची निव्वळ फसवणूक आहे. एक हत्ती पकडून वेळ मारून नेण्याचे हे काम आहे. केवळ एक हत्ती नाहीतर इतरही हत्ती पकडले पाहिजेत. महायुती सरकार आणि प्रशासन जर एक हत्ती पकडून पुन्हा ग्रामस्थांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करत असतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष गप्प बसणार नाही. ग्रामस्थांना सोबत घेऊन याविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल असा इशारा वैभव नाईक यांनी दिला आहे.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, तालुकाप्रमुख संजय गवस, महिला आघाडी जिल्हा संघटक विनिता घाडी, उपतालुकाप्रमुख मिलिंद नाईक, दोडामार्ग नगरसेवक चंदन गावकर, विभागप्रमुख संतोष मोर्ये, मोर्ले सरपंच संजना धुमासकर, सिद्धेश कासार, संदेश वरक, नेहनी शेटकर, सोशल मिडीया तालुकाप्रमुख संदेश राणे, प्रेमानंद ठाकूर, शुभंकर देसाई आदींसह मोर्ले ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
1
/
98
कोकणातला पहिला पाऊस... आणि चढणीचे मासे
कणकवली नगरसेवक बाळू पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा! #kankavli #sindhudurg
मग मूठभर भगवाधार्यांसाठी पोलीस कशाला ? #niteshrane #kolhapur
छत्रपती शिवरायांचा मावळा असा छातीठोकपणे उभा राहतो #niteshrane #kolhapur
आम्ही सर्व धर्म समभाव आम्ही मानत नाही #niteshrane #kolhapur
या लोकांच्या अब्बाचा पाकिस्तान आहे का ? #niteshrane #kolhapur
जे नियम हिंदूंना लागतात ते नियम इतर धर्मांना पण लागले पाहिजेत... | Nitesh Rane #niteshrane
अणुऊर्जा प्रकल्पावर सुशांत नाईक यांचा राणेंना टोला - Sushant Naik #kankavli
आपल्या मर्जीशियावाय कोणालाही तिथे फिरकू देऊ नका #niteshrane #devgad #sindhudurg
पर्यावरणाला हानी पोहोचणारा कोणताही प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही... #niteshrane
मी माझ्या देवगडवर कोणालाही वाकड्या नजरेने बघू देणार नाही - नितेश राणे #niteshrane
मुळात या प्रकल्पाबाबत आम्हाला कोणालाही माहिती - nitesh Rane #niteshrane
1
/
98


Subscribe










