पणदूर येथील अवैध दारुधंद्याचा कुडाळ पोलिसांकडून पर्दाफाश

कुडाळ: प्रतिनिधी


सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर कारवाई करून ते समूळ नष्ट करण्याबाबत पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. कुडाळ पोलिसांनी आज, शुक्रवारी दारूविक्रीचा पर्दाफाश केला.
तालुक्यातील पणदूर येथील शंकर बाळकृष्ण केळुसकर (वय ५८, पणदूर मयेकरवाडी, ता. कुडाळ) याच्या राहत्या घराच्या बाजूस असलेल्या शेडमध्ये नॅशनल रॉयल ब्रँड लेबल असलेल्या १८० मिलि. ४८० बॉटल्स (प्रत्येकी १२० रु. एकूण किंमत ५७ हजार ६०० रु, मॅकडोनाल्ड नंबर १ व्हिस्की लेबल असलेली ९६ बॉटल्स, प्रत्येकी किंमत २०० रु. प्रमाणे किंमत १९ हजार २००, डीएसपी ब्लॅक डिलक्स व्हिस्की लेबल असलेल्या १८० एमएलच्या ४८ बॉटल्स प्रत्येकी किंमत २०० रु. प्रमाणे एकूण ९ हजार ६००, रॉयल चॉइस कोकोनट फेणी लेबल असलेल्या ३७५ एमएलच्या ९६ बॉटल्स प्रत्येकी किंमत २०० रु. प्रमाणे एकूण किंमत १९ हजार २००, ट्युबर्ग स्ट्रॉंग 20 प्रत्येकी किंमत 150 रुपये प्रमाणे एकूण किंमत ३ हजार, किंगफिशर स्त्राँग ५०० मिली २० टीन, प्रत्येकी किंमत १५० एकूण ३ हजार आणि हायर कंपनीचा फ्रिज किंमत ₹ १० हजार असा एकूण १ लाख २१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, पोलीस अंमलदार देवानंद माने, कृष्णा केसरकर, महेश जळवी, हरेश पाटील, शांताराम वराडकर यांनी केली.

error: Content is protected !!