कुडाळ-मालवणच्या विकासासाठी आ. वैभव नाईकच हवेत :संतोष मुंज
घावनाळे येथे महाविकास आघाडीचा मेळावा संपन्न
कुडाळ : विधानसभेच्या निकालाच्या निकालाच्या निकाल महाविकास राज्याचे लोक आणि त्यात आ. वैभव संभाव्य मंत्री असतील असा विश्वास स्थानाच्या मेळाव्यात पदा विकासनी व्यक्त केला आहे. घावनळे येथे संतोष मुंज यांच्या शॉपील असा पटांगणात महाविकास राज्याचाळावा पार पाडला.

यावेळी.आ.वैभव नाईक,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते गौरीशंकर खोत, काँग्रेस उपतालुकाध्यक्ष संतोष मुंज ,काँग्रेस तालुका सचिव पांडु खोचरे,घावनळे माजी सरपंच दाजी धुरी, माजी उपसरपंच प्रभाकर खोचरे,शिवसेना उप तालुका प्रमुख कृष्णा धुरी, पप्पू महाडेश्वर,सुधीर राऊळग्रा.सदस्य सुनिल खोचरे,महेश पालव,सुनिल पारकर,बाबु शेळकेनंदकुमार घाडीगावकर,शेखर सांवतचंदु जाधव,उदय लाड,दाजी पालव,हनुमंत देसाई,प्रमोद खोचरे आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. वैभव नाईक यांच्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला:संतोष मुंज
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संतोष मुंज म्हणाले आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांमुळे भात पिकाला योग्य हमीभाव मिळून भात खरेदी सुरू झाली. शेतकर्यांना बोनसही मिळून दिला. शेतकऱ्यांना आमदार वैभव नाईक यांच्यामुळे न्याय मिळाला असे मुंज यांनी सांगून मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची विकास कामे त्यांनी केले त्यामुळे सर्व सामान्यांचे आपला आमदार म्हणून वैभव नाईक यांनाच पसंती आहे. नाईक यांना आम्ही निवडून आणणार असा निर्धार करुया असे संगत बेसावध राहू नका घराघरापर्यंत मशाल निशाणी पोहोचवा असे आवाहन त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना केले आहे.
कोट्यावधी रुपयांची विकास कामे पाहून राणेंना धडकी भरली: गौरीशंकर खोत
यावेळी बोलताना गौरीशंकर खोत म्हणाले आ.वैभव नाईक यांनी मतदार संघात केलेली कोट्यावधी रूपयाची विकासकामे कामे पाहून नारायण राणे यांना धडकी भरली असून आपली घराणेशाही चालण्यासाठी माजी केंद्रीय उद्योगमंत्र्यांला दारोदार फिरण्याची वेळ आली आहे यातूनच आमदार वैभव नाईक यांचे काम बोलत आहे पुढे बोलताना ते म्हणाले की कुडाळ-मालवणच्या जनतेला नारायण राणेंची घराणेशाही नेस्तनाबूत करण्याचे आव्हान देखील त्यांनी यावेळी केली आहे.
राणे कुटुंबीय निवडणुकीचे वारे बघून पक्ष बदलणारे:आ.वैभव नाईक
आ. वैभव नाईक म्हणाले आपण ५ वर्ष मतदारसंघात विकास कामे करताना महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच कामे केली आहेत,महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आजपर्यंत जशी साथ दिली तशीच यापुढे देखील द्यावी असं सांगत राणे कुटुंबीय निवडणुकीचे वारे बघून पक्ष बदलणारे आहेत. जे आपल्या पक्षाशी प्रामाणिक राहू शकत नाही ते आपल्या जनतेशी काय प्रामाणिक राहणार म्हणूनच जनतेशी एकनिष्ठ न राहणाऱ्या राणे कुटुंबाला आता घरी बसवण्याची वेळ आली आहे असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.













