मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला विश्वास
तिला २०० कोटींचा आढावा पूर्ण
आपल्या लोकांनाचा ७ कोटी मोबदला मंजूर करा
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी शिरोडा येथे आज दिनांक १० नोव्हेंबर रोजी मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिरोडा येथील सरपंच लतिका रेडकर यांचा प्रवेश घेतला. यावेळी दीपक केसरकर यांनी मनसे आपल्या सोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी ते म्हणाले,राज ठाकरे यांचे व माझे चांगले संबंध आहेत. त्यामुळे महायुती म्हणून सिंधुदुर्गात मला मनसे नक्कीच मदत करेल, दरम्यान शिरोडा-रेडी परिसरातील लोकांना शुध्द पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून शिरोडा बाजारपेठेतील रस्ता क्रॉकीटचा करण्यात येणार आहे तर यशवंतगडाच्या ठिकाणी नव्याने झुलता पुल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे शिरोडा- रेडी जोडले जाणार आहे, असे ही ते यावेळी म्हणाले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा संघटक संजू परब, तालुकाप्रमुख नारायण राणे, शिरोडा विभागप्रमुख अमित गावडे, ग्रामपंचायत सदस्य जगन बांदेकर उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, भाजप शिरोडा ग्रामपंचायत सदस्य मयुरेश शिरोडकर सुरज परब आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या जमिनीचा ७ कोटी मोबदला मंजूर
यावेळी मंत्री केसरकर बोलताना पुढे म्हणाले. तिलारीचा २०० कोटीचा प्रकल्प पूर्ण झाला आहे. त्याचा फायदा आता शिरोडा, रेडी. आरोंदा, वेंगुर्ला आधी गावांना होणार आहे. शिरोड्यातील मुख्य रस्ता मंजूर असून त्याच्या दोन्ही साईडला गटार मंजूर करण्यात आले आहेत. नवीन प्रस्ताव केंद्रीय निधीसाठी सादर केला आहे. काँक्रीटचा रोड बाजारपेठेतून झाला तर लोकांचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीचा सात कोटींचा मोबदला मंजूर झाला आहे. तो आचारसंहिता संपल्यानंतर तीन टपयांमध्ये देण्यात येणार आहे. शिरोड्याला खूप मोठे भवितव्य आहे. केरवाडी येथे नवीन बंदर बांधण्यात येणार आहे. दरम्यान यशवंतगडाच्या ठिकाणी नव्याने झुलता पुल उभारण्यात येणार असून त्याचा पर्यटनावर मोठ्या प्रमाणात चालना मिळेल.













