संपूर्ण महाराष्ट्रात माझा वाढदिवस सप्ताह साजरा करण्याची प्रथा रूढ करणारे दिनेश वारंग मित्रमंडळ आ. निलेश राणे यांचे – गौरवोदगार
संपूर्ण घावनळे झाले भगवामय
कुडाळ : निमित्त होते सन्माननीय आमदार निलेश राणे साहेबांच्या वाढदिवसाचे घावनळे गावचे माजी उपसरपंच विद्यमान ग्रा.पं.सदस्य आणि शिवसेनेचे युवा नेतृत्व सन्माननीय श्री. दिनेश वारंग व मित्र मंडळ आणि घावनळे शिवसेना यांच्या संकल्पनेतून साहेबांचा वाढदिवस सप्ताह दिनांक १२ मार्च ते १८ मार्च पर्यंत आयोजित करण्यात आला.
दिनांक १२ मार्च २०२५ ते १६ मार्च २०२५ या कालावधीत घावनळे आईनमाळा येथे एक गाव एक संघ क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत नामांकित १६ संघांना प्रवेश देण्यात आला. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या नव्या स्पोर्ट होडावडा संघाला ५०५५५/-रुपये रोख पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले. तर D.R. स्पोर्ट माणगाव संघास २५५५५/- रुपये रोख पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले. मालीकाविरसाठी असलेली सायकल होडावडा गावचा सुपुत्र बबल नाईक याने पटकाविली. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक यांना टेबल fan देऊन गौरविण्यात आले.
हि स्पर्धा नावाजली गेली ती दिनेश वारंग मित्रमंडळच्या एकीने, जिल्ह्यातील अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीने, शिस्तबद्ध नियोजन, उत्कृष्ट पंच, नामांकित समालोचक, you tube live सामने आणि सोबतच स्पर्धेच्या शीर्षक गीतांनी संपूर्ण महाराष्ट्र व गोव्याला भुरळ घातली.
सप्ताहाच्या सहाव्या दिवशी सामाजिक वसा उचललेल्या दिनेश वारंग व त्यांच्या मित्रमंडळीनी रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक १७/०३/२०२५ रोजी ग्रामपंचायत घावनळे येथे केले तीस रक्तदात्यांनी रक्तदान करून सामजिक कार्यास हातभार लावला.
सन्माननीय दिनेश वारंग यांची मुलगी कोकण सन्मान प्राप्त, कोकणी पोरग्या कु. निधी वारंग व सन्माननीय आमदार निलेश राणे साहेब यांच्या वाढदिवशी रक्तदान शिबीर आयोजित करून दिनेश वारंग साहेबांनी वाढदिवस साजरा करण्याची अनोखी प्रथा गेली कित्येक वर्ष घावनळे गावात रूढ केली आहे. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे दिनांक १८/०३/२०२५ रोजी घावनळे गावातील सर्व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, नेत्र तपासणी शिबीर आणि घावनळे गावातील सर्व प्राथमिक शाळा व अंगणवाडीतील बाल गोपाळासाठी गोड खाऊचे वाटप करून खऱ्या अर्थाने सन्माननीय राणेसाहेबांचा वाढदिवस सप्ताह गोड केला.
या अनोख्या आणि संपूर्ण जिल्हाभर चर्चेत राहिलेल्या वाढदिवस सप्ताहाने श्री. दिनेश वारंग यांनी गावातील बालगोपाळ, युवा वर्ग, महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक या सर्वांना एकत्र आणून सामाजिक बांधिलकी जपल्याची चर्चा आहे.
असा धगधगता, सामाजिक कार्याने पेटून उठलेला, प्रत्येकाला सोबत घेऊन चालणारा, दिनेश वारंग सारखा कार्यकर्ता मला लाभला हे माझे भाग्यच, असे गौरवोद्वार श्री. निलेश राणे साहेबांकडून ऐकायला मिळाले.
हा वाढदिवस सप्ताह ज्यांच्या वाढदिवसानिमित्त होता असे लाडके आमदार श्री. निलेश राणे साहेब स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. या सप्ताहाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ताजी सामंत साहेब, माजी जि.प. अध्यक्ष श्री. संजय पडते साहेब, उपजिल्हा प्रमुख श्री. आनंद भाई शिरवलकर, श्री. दिपकजी नारकर श्री. विनायक राणे साहेब, श्री. अरविंद करलकर, श्री. दादा साईल, श्री. दत्ता कोरगावकर, श्री. नागेश आईर श्री. मिलिंद नाईक, घावनळे सरपंच आरती वारंग, उपसरपंच योगेश घाडीगावकर, तंटामुक्ती अध्यक्ष अमोल पालव, माजी चेअरमन जयराम सुद्रिक ज्येष्ठ शिवसैनिक प्रभाकर वारंग, श्री. महादेव कोरगावकर, सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेदरम्यान कुडाळ च्या नगराध्यक्षा श्रीम. प्राजक्ता शिरवलकर व सर्व महिला नगरसेविका, तसेच माजी नगराध्यक्ष श्री. ओंकार तेली साहेब व अभी गावडे, चेतन पडते, रोहित भोगटे आणि कुडाळ शहरातील व घावनळे पंचक्रोशीतील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
भाजप तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, रुपेशजी कानडे, पप्या तवटे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
या सप्ताहाचा समारोप कार्यक्रम हळदीकुंकू ज्यांच्या सहकार्यातून झाला त्या माजी जि.प. अध्यक्ष श्रीम. दीपलक्ष्मी पडते, महिला जिल्हा प्रमुख श्रीम. वर्षा कुडाळकर व अनेक महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
आईनमाळा खुटवळवाडी ग्रामस्थ, बामनादेवी, भुइवाडा क्रिकेट संघ सर्व दिनेश वारंग मित्र मंडळ चे सदस्य आनंदभाई शिरवलकर, दादा साईल, दत्ता कोरगावकर, राजकुमार घावनळकर, राजु नाईक व सहदेव घाडी सर यांचे या संपूर्ण सप्ताहासाठी विशेष सहकार्य लाभले.
दिनेश वारंग साहेबांनी या संपूर्ण साप्ताहाबद्दल एकाच वाक्यात दिलेली प्रतिक्रिया म्हणजे याचसाठी केला होता अटठाहास.














