रस्त्यात गाडी लावल्याच्या वादात दुचाकी स्वाराने केला टेम्पो चालकावर चाकू हल्ला…

वैभववाडी : रस्त्यात मध्ये गाडी लावल्याच्या कारणावरुन झालेल्या वादात मोटार सायकलस्वाराने टेम्पो चालकावर चाकू हल्ला केला. यात टेम्पो चालक मयूर पांडुरंग यादव रा नापणे हा जखमी झाला आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून मोटार सायकलस्वार अंकुश सावजी खेडेकर रा. खोकूर्ले ता गगनबावडा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मोटार सायकल स्वार खेडेकर यांनी टेम्पो चालक यादव याने शिवीगाळ व माराहाण केल्याची परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. त्यामुळे दोघांवरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास नापणे कोकाटेवाडी येथे घडली.

फिर्यादी मयूर पांडुरंग यादव हा टेम्पो चालक आहे. तो गोकुळ डेरीचे दुध संकलन करतो. सोमवारी सायंकाळी तो आपल्या पत्नीसह हेत भुईबावडा उंबर्डे येथून दूध संकलन करून नापणे कोकाटेवाडी येथे आला असता रस्त्यात मध्ये मोटरसायकल उभी करुन मोटरसायकलस्वार खेडेकर हा फोनवर बोलत होता. तर त्याचा मित्र गाडीच्या मागे बसला होता यावेळी टेम्पोतून उतरून यादव यांनी मोटरसायकलस्वाराला गाडी बाजूला घेण्यात सांगितले. यावरुन त्यांच्यात झालेल्या बाचाबाची खेडेकर यांनी यादव याला माहाराण करीत आपल्याकडे असलेला चाकूने त्याच्या छातीवर व हातावर वार केले. यात यादव जखमी झाला. यादव यांच्या पत्नीने बोंबाबोंब केल्यामुळे कोकाटेवाडीतील लोक जमा झाले. त्यांनी यादव याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अशी फिर्याद मयूर यादव दिली आहे. त्यानुसार मोटार सायकलस्वार अंकुश खेडेकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

तर परस्पर विरोधी फिर्याद अंकुश खेडेकर रा. खोकूर्ले ता गगनबावडा यांनी दिली आहे. त्यानुसार तो आपला मित्र अमोल पडवळ याच्या यांना घेऊन त्याची सासुरवाडी नाधवडे येथे उंबर्डे नापणे मार्गे नाधवडे येथे जात होता. नापणे कोकाटेवाडी येथे त्याला त्याच्या पत्नीचा फोन आला. म्हणून गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करून तो बोलत होता. दरम्यान टेम्पो चालक मयूर यादव टेम्पो घेऊन आला. त्याने गाडी रस्त्यात का लावली असं विचारत शिवीगाळ करून हाताने, बांबूने माराहाण केल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार टेम्पो चालक मयूर यादव याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

error: Content is protected !!