मुंबई : शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांनी कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांची वाढदिवसानिमित्त मुंबई येथे सदिच्छा भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत आरिफ मुजावर देखील उपस्थित होते.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर हे आमदार निलेश राणे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. आज वाढदिवसानिमित्त आ. निलेश राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी मुंबई येथे त्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.