रत्नागिरी : कोकण किंवा कोकणी माणूस जेव्हा संकटात सापडतो तेव्हा राणे कुटुंबीय त्यांच्या मदतीला नेहमीच धाऊन येते हे अनेकदा सिद्ध झाले आहे. काल रत्नागिरीमध्ये पुन्हा एकदा याचा प्रत्यय आला.
रत्नागिरी येथील निहाल धामस्कर यांचे वडील नाझिम धामस्कर यांना रत्नागिरीच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. परंतु रत्नागिरी येथे उपचार होणे शक्य नसल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी पुणे किंवा कोल्हापूरला हलवण्यास सांगितले. परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्या ठिकाणी उपचार होणे शक्य नव्हते. ही बाब राणे समर्थक शोएब खान व रफिक मुकादम यांनी आ. निलेश राणे यांच्या कानावर घातली. यावेळी निलेश राणे नेहमीप्रमाणेच त्यांच्या मदतीसाठी तत्काळ धाऊन आले. राणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून निलेश राणे यांच्या एका फोनवर आज सकाळी ७ वाजता मुंबईच्या प्रसिद्ध लीलावती हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर मोफत उपचार सुरू आहेत. याबद्दल धामस्कर कुटुंबीयांनी आ. राणे यांचे मनापासून आभार मानले.
या घटनेनंतर समस्या कोणतीही असो त्याच्यावर एकमेव रामबाण उपाय म्हणजे आ. निलेश राणे हे समीकरण संपूर्ण कोकणाला माहीत झाले आहे. कोकण म्हणजे राणे आणि राणे म्हणजेच कोकण असे का म्हटले जाते याचे उत्तर या घटनेमुळे सर्वांना कळले आहे.













