आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य
कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस सिंधुदुर्गात १७ मार्च रोजी जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित आज कुडाळ तालुक्यातील पणदूर येथे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दादा साईल मित्रमंडळ आयोजित, शिवसेना शाखा पणदूर पुरस्कृत क्रिकेटमध्ये स्पर्धेचे उद्घाटन माजी जि. प. संजय पडते, माजी जि. प. दीपलक्ष्मी पडते, जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी, दादा साईल, तालुकाप्रमुख अरविंद करलकर, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, तालुकाप्रमुख बंटी तुळसकर, सिद्धी शिरसाट, चंद्रकांत साईल सर, रामचंद्र नरे सर, सरपंच पल्लवी पणदूरकर, माजी पंचायत समिती सभापती राजन जाधव, सावळाराम अणावकर, माजी सरपंच बापू सावंत, विनायक अणावकर, कुबल गुरुजी, माजी सरपंच शिवराम पणदूरकर, बावचे माजी सरपंच नागेश परब, बाळू गावणकर, राकेश कांदे, देवेंद्र सामंत, गणेश साईल, माजी पोस्ट मास्तर उत्तम पणदूरकर, माजी सरपंच बबन पणदूरकर, हरेश साईल, निखिल कांदळगावकर, प्रशांत परब, तात्या सावंत, पवन पणदूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार चषक २०२५ क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरू झाली असून पुढील तीन दिवस ही स्पर्धा रंगणार आहे.













