कोंडूरा गावातील कर्णबधीर शाळेतील मतीमंद मुलांना खाऊ वाटप
सावंतवाडी: आज ९ मार्च दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी स्वबळावर स्थापन केलेल्या हिंदुसाठी महाराष्ट्रातील मराठी साठी आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झगडत पक्षाला आज १९ वर्ष पुर्ण झाली. त्यामुळे आज पक्ष निरीक्षक आणि महाराष्ट्र सरचिटणीस संदिप दळवी, गजानन राणे व सावंतवाडी विधान सभा संपर्क अध्यक्ष महेश परब यांच्या मार्गदर्शना खाली कोंडूरा येथील कर्णबधीर शाळेत जाऊन मुलांसोबत खाऊ वाटप करून आनंदात साजरा केला.
जिल्हा उपाध्यक्ष सुधीर राऊळ यांनी त्या शिक्षकांसोबत चर्चा करून त्या विद्यार्थ्यांची विचारपूस केली. सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांची ओळख करून दिली सावंतवाडी संपर्क अध्यक्ष अमित नाईक यांनी सर्वाना १९ व्या वर्धापन दिनांच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी उपस्थित शिक्षक व मनसे पदाधीकारी विभाग अध्यक्ष राकेश परब , गौरेश पालयेकर, बाबु गोडकर, संतोष गोडकर, चिन्मय नाडकर्णी, आत्माराम बांदेकर, सचिन पांगम यांनी मुलांना खाऊ वाटप करून वर्धापन दिन आनंदात साजरा केला.













