कोणी पॅन्ट काढली अंगावर लघुशंका केली..संतोष देशमुख हत्या प्रकरणी हादरवून टाकणारे फोटो समोर

बीड: बहुचर्बीचत असे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण रोज नवे वळण घेत आहे. संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुखांची हत्या करताना त्यांना मारहाण करण्यात आली होती. आता त्यांना मारहाण करतानाचे आणि हत्येचे काही फोटो सिंधू दर्पण च्या हाती लागले आहेत.यात आरोपींचे चेहरे स्पष्ट पाहायला मिळत आहे. तसेच संतोष देशमुखांना झालेल्या मारहाणीचे 8 फोटो आणि 15 व्हिडीओ समोर आले आहेत. संतोष देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरणातून झाल्याचे समोर आले आहे.सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीने चार्जशीट दाखल केली आहे. यात 66 पुरावे आणि 184 जबाब महत्त्वाचे ठरले आहेत. सध्या हे प्रकरण न्यायालयात असून याप्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत. संतोष देशमुख हत्येप्रकरणी दाखल केलेल्या आरोप पत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. त्यातच आता संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे 8 फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे सर्व फोटो संवेदनशील आहेत. त्यामुळे हे फोटो आम्ही प्रसिद्ध करु शकत नाही. तसेच ‘सिंधू दर्पण’ या फोटोंना दुजोरा देत नाही.

संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील हादरवणारे फोटो;

१. यातील पहिल्या फोटोत जनावरांप्रमाणे मारहाण केल्यानंतर जयराम चाटे संतोष देशमुख यांची पँट काढतोय.

२.दुसऱ्या फोटोत आरोपी महेश केदार हा त्या दृष्याचे सेल्फी घेत हैवानासारखा हसतो.

३.तिसऱ्या फोटोत अमानुष मारहाणीनंतर संतोष देशमुख अर्धमेले झाले, तेव्हा प्रतिक घुले देशमुखांच्या छातीच्या दोन्ही बाजूला पाय टाकून चेहऱ्यावर लघवी करतो.

सुदर्शन घुले देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढतो. त्यावेळी हैवानी आवेश चेहऱ्यावर दिसतोय.

मारेकरी जयराम चाटे देशमुखांच्या अंगावर शर्ट ओरबाडून काढतो. काढलेला शर्ट हातात धरुन हसतो.

यानंतर मारेकरी पाईप आणि वायरने देशमुखांवर वार करतात. लाथा-बुक्क्यांनी मारहाण शिवीगाळ होते.

वायरीसारख्या हत्याराचं बंडल देशमुखांच्या पाठीवर मारुन वार केले जात आहेत.

ही दृश्य हादरविणारी असून हे कृत्य करताना राक्षसांच्या हृदयाला पाझर कसा फुटला नाही. अशावेळी महेश केदार सारं हसत हसत शूट करतो.

मारहाणीनंतर सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे, असं देशमुखांनी म्हणावं, यासाठी त्यांना जबरदस्ती केली जाते.

संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवून त्यांच्या पाठीवर पाईपने मारहाण होते.हैवानासारख्या मारहाणीनंतर देशमुखांना शरीरातील रक्त ओघळून त्यांच्या तळपायापर्यंत आल्याचे दिसतंय.

error: Content is protected !!