कुडाळ शहरातील विठ्ठलवाडी,अभिनवनगर मधील विविध विकास कामांचा मा. आम. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शुभारंभ

नगरसेवक,आरोग्य सभापती मंदार शिरसाट यांचे प्रयत्न

         माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून व  कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक तथा आरोग्य सभापती मंदार शिरसाट यांच्या प्रयत्नांतून कुडाळ शहरातील  वॉर्ड क्र. १४ विठ्ठलवाडी,अभिनवनगर मध्ये विविध विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. रविवारी मा.आम. वैभव नाईक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, नगरसेवक मंदार शिरसाट, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, माजी नगरसेविका मेघा सुकी,अमित राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वॉर्ड क्र. १४ विठ्ठलवाडी,अभिनवनगर मधील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. 

      विकासकामांमध्ये अभिनवनगर पारिजात कॉम्लेक्स येथे जाणाऱ्या वाटेवर काँक्रीटीकरण करणे, अभिनवनगर येथे पारिजात कॉम्लेक्स ते गवंडे घर पर्यंत गटार बांधणे, विठ्ठलवाडी साळवी घर ते आरोलकर घर पर्यंत गटार बांधणे, विठ्ठलवाडी मुख्य नाला उर्वरित काम पुर्ण करणे, विठ्ठलवाडी येथे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकणे -टप्पा पहिला,अभिनव नगर मध्ये विद्युत ट्रान्सफार्मर बसवणे, विविध ठिकाणी पाण्यामध्ये गप्पीमासे सोडणे या कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्याबद्दल ग्रामस्थांनी सर्व लोकप्रतिनिधींचे आभार मानले.
error: Content is protected !!