छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यास पोलिसांचा विरोध मात्र…
तेलंगणा: दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवजयंतीमध्ये शिवभक्तांचा उत्साह पाहायला मिळाला. याच दरम्यान, तेलंगणामधून एक बातमी समोर आली आहे. शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार होते. मात्र, पोलिसांनी ते होवू दिले नाही आणि पुतळा प्लास्टिकने झाकून टाकला. मात्र, अचानक सोसाट्याचा वारा आला आणि शिवरायांच्या पुतळ्यावरील प्लास्टिक अलगद उडून गेले आणि एकप्रकारे उद्घाटन झाले.कॅमरामध्ये कैद झालेली ही घटना सर्वत्र व्हायरल होत आहे.
పోలీసులు ఆపేస్తే, ప్రకృతి ఊరుకుంటుందా..
నిజామాబాద్ జిల్లా, ఖానాపూర్ విలేజ్, భాగ్యనగర్ చౌరస్తాలో అద్భుతమైన సంఘటన చోటు చేసుకుంది.చత్రపతి శివాజీ మహారాజ్ జయంతి సందర్భంగా విగ్రహ ఆవిష్కరణ ఏర్పాటు చేశారు. కానీ ఆ విగ్రహాన్ని ఆవిష్కరించడానికి వీల్లేదని పోలీసు వారు చెప్పి, కవర్ కప్పి… pic.twitter.com/qYmEOHHfjB
या व्हिडीओमध्ये शिवरायांचा पुतळा प्लास्टिकने झालेला दिसत आहे आणि सभोवताली भगव्या रंगाच्या पताका-झेंडे लावलेले दिसत आहेत. पोलिसांनी पुतळ्याचे अनावरण रोखल्याने अनेकांची गर्दीही दिसून येत आहेत.याच दरम्यान, अचानक जोराचा वार येतो आणि पुतळ्यावरील झाकेलेले प्लास्टिक अलगद निघून पडते. एखाद्या चित्रपटामध्ये घडणाऱ्या घटनेसारखेच हे दृश्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील प्लास्टिक उडून पडताच उपस्थित स्थानिकांनी एकच जल्लोष या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.