खवणे येथे बस पलटी

वेंगुर्ला: खवणे येथे रात्री वस्तीला असलेली एसटी बस गाडी आज सकाळी सव्वा सहाच्या दरम्यान कुडाळच्या दिशेने बाहेर पडताना चालकाला रस्त्यावरील चढावाचा अंदाज न आल्याने गाडी बाजूला घळणीमध्ये पलटी होऊन अपघात झाला. एसटी बसते नुकसान झाले असून सुदैवाने गाडीतील चालक वाहक बचावले आहेत.आज शनिवारी सकाळची वस्तीची खवणे कुडाळ गाडी वळवण्यासाठी वरच्या मारुती मंदिराकडे नेत असताना सकाळी ६.१५ च्या सुमारास केळुस्कर यांच्या घरासमोरील घळणीवर पलटी होऊन अपघात झाला आहे. गाडीमध्ये फक्त वाहक आणि चालक होते. त्यांना किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने मोठी हानी टळली आहे. वस्तीच्या ठिकाणावरून बाहेर पडत असतानाच हा अपघात झाल्याने गाडीत प्रवासी नव्हते त्यामुळे अनर्थ टळला आहे. खवणे गावात एसटीचा एवढा मोठा पहिल्यांदाच अपघात झाला आहे. या अपघातात गाडीचे मात्र नुकसान झाले आहे.

error: Content is protected !!