सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत निधी मंजूर
कुडाळ तालुक्यात तीन, तर मालवणला सात ट्रान्स्फॉर्मरना मंजुरी
सिंधुदुर्गनगरी: सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील वीज यंत्रणा बळकटीकरणासाठी ५ कोटी ५७ लाख एवढा निधी मंजूर झाला आहे.आमदार नीलेश राणे यांनी किनारपट्टीवरील वीज यंत्रणा सुधारण्यासाठी विशेष लक्ष देत सिंधुरत्नमधून एकूण ३० ट्रान्स्फॉर्मरची मागणी केली होती. त्यानुसार सिंधुरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांनी पहिल्या टप्यात कुडाळ तालुक्यातील तीन, तर मालवण तालुक्यातील सात अशा दहा ट्रान्स्फॉर्मरना मंजुरी दिली आहे. यात देवबाग मोबारवाडी ट्रान्स्फॉर्मर, मालवण फोवकांडा पिंपळ, सर्जेकोट, वायरी भुतनाथ, कांदळगाव-परबवाडा येथे १०० केव्हीचे ६ ट्रान्स्फॉर्मर डीटीसी व ११ केव्ही लाइन उभारणे, खैदा घुमडे, मालवण बोर्डिंग ग्राउंड येथे येथे १०० केव्हीए, कुंभारमाठ गवळीवाडीनजीक २०० केव्हीए, रांगणा तुळसुली कदमवाडी येथे १०० केव्हीए ट्रान्स्फॉर्मर बसवणे, बांव आंबेडकरनगर येथे १०० केव्हीए ट्रान्सफार्मर उभारणे, आंदुर्ले दाभोलकरवाडी येथे येथे १०० केव्हीए डीटीसी बांव ट्रान्स्फॉर्मर उभारणीसाठी मंजुरी मिळाली आहे.













