गावारेड्याच्या धडकेत पादचारी गंभीर

सावंतवाडी : चालत जाणाऱ्या पादचाऱ्याला गव्याच्याकळपाने धडक दिल्यामुळे तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज साडे सात वाजता नेमळे-बिसोळे येथे घडली. सोनू मधुकर राऊळ (वय ३८) असे त्यांचे नाव आहे. त्यांना अधिक उपचारासाठी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु त्यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे गोवा-बांबुळी येथे हलविण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.

error: Content is protected !!