दत्ता सामंत यांचा उबाठा सेनेला धक्का

मसदे गावचे माजी सरपंच कमलेश प्रभू यांच्या हाती धनुष्यबाण

मालवण : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का दिला आहे. मसदे गावचे उबाठा गटाचे माजी सरपंच कमलेश प्रभू यांनी दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांची सुकळवाड – पोईप जि. प. विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, उबाठा गटाच्या ग्रा. पं. सदस्य सौ. केतकी कमलेश प्रभू यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. याप्रसंगी माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, बांदिवडे सरपंच आशु मयेकर, बाबू परब, मंदार लुडबे, मनोज हडकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!