तर राजन नाईक आणि संतोष शिरसाट यांच्या वैयक्तिक राजकारणामुळे संघटना पोखरत चालली आहे.याचा विचार पक्षाने करावा.
कुडाळ : ज्यांनी स्वतः चार-चार पक्ष बदलले आहेत त्यांनी हे चार पक्ष बदलताना प्रत्येक पक्षाकडून किती घेतले हे जाहीर करावे.श्री.संतोष शिरसाट यांची पार्श्वभूमी संघटना पोखरणारी आहे.पहिली शिवसेना फोडण्याचे काम यांनीच केले होते.आणि याचा मी स्वतः साक्षीदार आहे.यांचबरोबर घरातल्या माणसांना तिकीट द्यायचे आणि त्यांनाच नंतर दुसऱ्या पक्षात जाण्यास प्रवृत्त करायचे ह्यात यांचा हाताखंडा आहे.मग यांना पैसे घेऊन दुसऱ्या पक्षात जाताना मदत करताना किती कमिशन घेतले?हेही जाहीर करावे.घरातूनच दिलेल्या उमेदवारांमुळे संघटनेची वाट लागली.आणि माझ्या भगव्या नामावर तुम्ही टीका केली तुम्हाला भगव्याचा एवढा द्वेष का? भगवे नाम लावणे हे हिंदू धर्माचे प्रतीक आहे. हिंदू धर्मातच सांगितले आहे की प्रत्येक पुरुषाने नाम लावावा. त्याप्रमाणे मी नाम लावतो. त्याबद्दल बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही.असेही कुडाळ नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी संतोष शिरसाट यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
तसेच ते बोलताना पुढे म्हणाले की,माझ्या वैयक्तिक जीवनावर बोलण्याचा आणि माझा बाप काढण्याचा कोणालाही अधिकार नाही.आमच्या घरातले विषय आम्ही बघून घेऊ याची तुम्ही काळजी करू नका. माझ्या बापाचे नाव घेऊन माझा अपप्रचार तुम्ही केलात पण याच लोकांनी मला निवडून दिले हे लक्षात ठेवावे.यापुढे कोणतीही वैयक्तिक टीका सहन केली जाणार नाही.असेही श्री.शिंदे म्हणाले.
त्याचप्रमाणे पक्ष बदलाचा निर्णय हा प्रत्येक नगरसेवकाने वैयक्तिक घेतलेला निर्णय आहे.पण या सगळ्या नगरसेवकांना हा निर्णय का घ्यावा लागला याचा तुम्ही अभ्यास करावा आणि आत्मपरीक्षण करावे नंतर टीका करावी.त्यामुळे तरी पुढची गळती थांबेल.माझे सहकारी नगरसेवक यांना भाजप पक्षात सन्मान मिळून देण्याचे काम मी करेन त्याची चिंता संतोष शिरसाट यांनी करू नये. त्यांनी आपली खुर्ची सांभाळावी.तसेच राजन नाईक आणि संतोष शिरसाट यांच्या वयक्तिक राजकारणामुळे संघटना पोखरत चालली आहे. याचा विचार पक्षाने करावा. राजन नाईक यांच्या बद्दल मी आता जास्त बोलणार नाही कारण माझे सहकारी श्री उदय मांजरेकर यांनी चांगलेच उत्तर दिलेले आहे.पण यापुढे वयक्तिक टीका झाली. तर पुढचा अध्याय प्रसिद्ध केला जाईल.असेही शिंदे यांनी सांगितले.













