स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाची कारवाई; १९ हजाराचा मुद्देमाल जप्त…
सावंतवाडी : कारीवडे गोसावीवाडी येथील जंगलमय परिसरात तीन पत्ती जुगार खेळताना तब्बल सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून जुगार खेळण्याच्या साहित्यासह तब्बल १९ हजार २५० रुपयाची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास सिंधुदुर्ग जिल्हा गुन्हा अन्वेषण पथकाकडून करण्यात आली.
प्रकाश रघुनाथ नार्वेकर (वय ६२) रा. सालईवाडा साटेलकर गिरणी जवळ, अनिल सुमन नाईक (वय-५६) रा. झिरंगवाडी, राजन गणपत देसाई (वय-४०) रा. माठेवाडा तळीजवळ, अनिल मारुती धोत्रे (वय-३१) रा. कारिवडे पेडवेवाडी, प्रणव कृष्णा परब (वय-३२) रा. कारिवडे पेडवेवाडी हळदीचा कणा, महेश्वर धनंजय मुळीक (वय-२९) रा. ओटवणे भटवाडी, कृष्णा धोंडीबा गोसावी (वय ५२) रा. विलवडे वरचीवाडी ता. सावंतवाडी अशी त्यांची नावे आहेत. याबाबतची तक्रार हवालदार रमेश पालकर यांनी सावंतवाडी पोलीस ठाणे दिली आहे. त्यानुसार सातही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास हवालदार संतोष गलोले करीत आहेत.