रुपेश कानडे मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम

कुडाळ : आपले सर्वांचे प्रेम व साथ या मुळे रुपेश कानडे मित्रमंडळ यांच्या माध्यमातून सलग ८ व्या वर्षी आपल्या तेर्सेबांबर्डे गावातील ई. बारावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना आज पासून सुरु होणाऱ्या बारावीच्या  संपूर्ण परीक्षा कालावधी करिता परीक्षा केंद्रावर ये-जा करण्या करिता मोफत वाहन व्यवस्था करण्यात आली व विद्यार्थ्यांना परीक्षे करता शुभेच्छा देण्यात आल्या.

या वेळी भाजप युवा मोर्चा कुडाळ मंडल तालुकाध्यक्ष श्री रुपेश कानडे, तेर्सेबांबर्डे सरपंच श्री रामचंद्र परब, ग्रामपंचायत सदस्य श्री महेंद्र मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य श्री गुणाजी जाधव, पोलीस पाटील श्री रमाकांत जाधव, ग्रामस्थ श्री एकनाथ गवस, श्री संदीप शेणई, श्री निलेश डगरे,श्री शशीपाल डीचोलकर उपस्थित होते.
error: Content is protected !!