मारहाण केल्याप्रकरणी गोठोस येथील चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल

कुडाळ : स्वतःच्या जागेत जेसीबीच्या साहाय्याने साफसफाई करत असताना शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी गोठोस येथील ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धुळोजी खरात आपल्या मालकीच्या जागेमध्ये जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई करत असताना धाकु धोंडी खरात, देवयानी धाकु खरात, सारिका चंद्रकांत खरात, शीतल आनंद खरात यांनी त्या ठिकाणी येत आमच्या मालकीच्या जागेत जेसीबी लाऊन का साफसफाई करतोस येथून जेसीबी घेऊन जा असे सांगितले. यावेळी धुळोजी यांनी मी माझ्याच मालकीच्या जागेत साफसफाई करत असल्याचे सांगितले. या गोष्टीचा राग येत धाकु धोंडी खरात, देवयानी धाकु खरात, सारिका चंद्रकांत खरात, शीतल आनंद खरात यांनी कॉलर पकडुन हाताच्या थापटाने कानशिलात मारून मारहाण केली. याबाबत चौघांवराही कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

error: Content is protected !!