कुडाळ आगारामध्ये आजच्या दिवशी ठराविकच बसेस उपलब्ध

प्रवाशांचे होताहेत अतोनात हाल

कुडाळ : कुडाळ आगारामध्ये आजच्या दिवशी ठराविकच बसेस उपलब्ध असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.

कुडाळ आगाराच्या १४ बसेस पंढरपूरसाठी रवाना झाले आहेत. तर १४ बसेस स्क्रॅप मध्ये काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी कुडाळ आगारामध्ये काही ठराविक बसेच उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रवाशांसह शाळकरी मुलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आज ठरलेल्या वेळेत बस न आल्याने अनेक विद्यार्थ्यांना रिक्षेने शाळेत जावे लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान झाले.

शिवाय उद्या बुधवारी कुडाळचा आठवडा बाजार आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास उद्याच्या आठवडा बाजारावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच दहावी व बारावीची परीक्षा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढावा अशी मागणी प्रवाशांसह विद्यार्थी व पालकांकडून होत आहे.

error: Content is protected !!