रायगड : मुलगी आणि वडिलांचे नाते खूप महत्त्वाचे मानले जाते, वडिलांना लाडक्या मुली असतात, पण जेव्हा बापच आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक करू लागतो आणि त्यांना चुकीच्या गोष्टी करायला भाग पाडतो तेव्हा त्यांना काय म्हणणार? रायगड जिल्ह्यातील महाड एम आय डी सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असाच एक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलगी हिने आपल्याच बापाविरुद्ध महाड एम आय डी सी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अत्याचारी बापास जेरबंद केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाड एम आय डी सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक परप्रांतीय कुटुंब राहत आहेत. पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्यापासून म्हणजे सन 2017 पासून नराधम बापाची वासनांध वृत्ती जागी झाली असल्याने त्याने मागचा पुढचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता आपल्याच पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करू लागला होता. पीडित मुलगी ही वडील सोबत घरीच राहत असल्याने आपली बदनामी होईल या भीतीपोटी 2017 पासून स्वतःची मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहिती वडिलांना असून देखील तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले.
वारंवार होत असलेले लैंगिक अत्याचार सहन सहन करीत होती. वारंवार होत असलेले लैंगिक अत्याचार सहन न झाल्यामुळे पीडित मुलीने अखेर पोलीस ठाणे गाठलं. आणि स्वतःच्या बापा विरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बापाने केलेल्या या धक्कादायक कृत्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये खळबळजनक वातावरण निर्माण झाल आहे. महाड एमआयडीसी पोलिसांनी पीडित मुलीच्या बापाला अटक केली असून त्याच्या विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समेळ सुर्वे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.













