माणूसपण हरवलेल्या ह्या कलियुगात मुका जीव देवदुत बनून आला

मालकाला वाचविण्यासाठी सर्जाने दाखवली सतर्कता

मालकाला अस्वस्थ पाहून सर्जाने थेट शेतातून मालकाला घरी आणले

मांगले: अस म्हणतात की मुक्या प्राण्यात आणि लहान मुलांमध्ये देव असतो.एखाद्याची निस्वर्थपने आणि निर्मळ मनाने केलेली सेवा नेहमीच त्या देवाच्या देव्हाऱ्यात नोंद करून ठेवलेली असते.आपल्या चांगल्या कर्मांची फळ आपल्याला तो कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन देतच असतो. असाच एक प्रसंग मांगले गावात घडला आहे.मांगले गावातील रहिवासी संभाजी महिपत तडाखे यांच्या वर काळ धावून आला होता मात्र आपल्या सर्ज्यावर केलेल्या निस्सीम प्रेमामुळेच की काय त्यांना पुन्हा एकदा नवीन जीवन मिळालं आहे.सर्जा हे त्यांच्या बैलाच नाव आहे .काय आहे नेमका प्रकार जाणून घेऊयात;

संभाजी महिपती तडाखे जनावरांसाठी वैरण आणण्यास आपल्या सर्जा बैल व एक्का घेऊन गेले होते. शेतातच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. एक हात, एक पाय जड झाल्याचे जाणवले. जीव लावून सांभाळ केल्याची परतफेड एका मुक्या जीवाने केली.मालकावर आलेले संकट ओळखून त्याने वेळीच मदत केली. माणसातल्या माणूसपणाचा लोप पावलेल्या या कलियुगात मात्र एका मुक्या प्राण्यामध्ये देवमाणूस दिसला.माणूस असून जनवरा प्रमाणे क्रूर वर्तन करणाऱ्या या माणसांच्याच सानिध्यात असलेला एक मुका जीव मात्र देवाचं देवत्व दाखवून गेला.

नेमकं काय घडलं?

याबाबत माहिती अशी, मांगलेपासून चार किलोमीटरवरचा बांबराचा डोंगर. संभाजी महिपती तडाखे जनावरांसाठी वैरण आणण्यास आपल्या सर्जा बैल व एक्का घेऊन गेले होते. शेतातच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. एक हात, एक पाय जड झाल्याचे जाणवले. त्यांनी ‘सर्जाऽऽऽ’ अशी बैलाला हाक दिली. बैलही लगेच जवळ आला. वैरण काढत असताना मालकाला अचानक त्रास झाला.मालकाने हाक दिली, पण ती नेहमीची नाही, हे मुक्या ‘सर्जा’ला जाणवले. अन् तडाखेंनी अर्धवट उचललेले जू त्याने स्वतः वाकत खांद्यावर घेतले. संभाजी तडाखे कसेबसे एक्क्यात बसले. झोपून राहिले. ‘सर्जा, घराकडे चल’ अशी साद देताच सर्ज्याने ‘जू’ची सापतीही गळ्याला लावली नसताना शेतातून मालकाला चार किलोमीटरवरून घराजवळ आणले.घरी आल्यानंतर सर्जाने हंबरडा फोडला. त्यामुळे कुटुंबीय बाहेर धाऊन आले. त्यांनी संभाजी तडाखेंना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर घरी आल्यानंतर ‘मुक्या जनावरांच्या या सतर्कतेमुळे मला जीवदान मिळाले’ असे त्यांना पाहण्यास येणाऱ्या प्रत्येकाला सांगताना संभाजी तडाखेंना अश्रू अनावर होत होते. वेळेत उपचार सुरू झाले आणि संभाजी तडाखे यांच्यावर जिवानिशी आलेले संकट टळले; सर्ज्या ह्या कलियुगात आपल्या मालकाने आपल्यावर केलेल्या निस्सीम प्रेमाला जगाला.खरंच माणसापेक्षा आपलेपणाचा ओलावा जपणारा मुका जीवच बरा.

error: Content is protected !!