शेतजमिनीची खातेफोड कशी कराल?
जमिनीची खातेफोड म्हणजे काय?जाणून घ्या
ब्युरो न्यूज: अनेकदा एकत्र कुटुंब पद्धती मध्ये शेतजमीन कसण्याचा भारा हा घरातील कुठल्यातरी एकच सदस्या वर येतो मात्र त्यापासून मिळणारे पीक मात्र सगळेजण वाटून खातात.असाच काहीसा विषय त्यानंतर शेतजमिनीचा मालकी हक्क प्राप्त करताना होतो. शेतजमिनी वरून तर अनेक वाद पाहायला मिळतात. तसेच शेतीतून पिकलेल्या उत्पादनाची विभागणी कशी करायची हा एक प्रश्न कायम आहे. त्यात बऱ्याच लोकांना खातेफोड पद्धत कशी आहे हे माहित नाही. खाते फोड म्हणजे एक प्रकारे जमिनीची वाटणी केली जाते. तसेच खाते फोड केल्याशिवाय सरकारी अनुदान आणि योजनांचा लाभ मिळत नाही. मग आता ही खातेफोड कशी केली जाते? हेच आपण जाणून घेणार आहोत.
खाते फोड म्हणजे काय?
शेतीतील वाद मिटवण्यासाठी खातेफोड ही केली जाते. महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85 नुसार जमिनीचे खाते फोड केली जाते. यासाठी संबंधीत कुटुंबातील सदस्यांशी चर्चा केली जाते. एकदा अंतिम निर्णय ठरला की लगेच कच्चा आराखडा तयार केला जातो. यामधे चतूर्सिमा दर्शवावी लागते.
एकाची जरी संमती नसली तरी ही प्रक्रिया अपूर्ण
खातेफोडसाठी सर्वांची सहमती अत्यावश्यकखाते फोडसाठीच्या प्रक्रियेसाठी संबंधित गट नंबरमध्ये जेवढे जमीनधारक व त्यांचे अपत्य आहेत. त्या सगळ्यांची संमती असणे आवश्यक असते. ठरविल्याप्रमाणे जर खातेफोड करण्यास एकाची जरी संमती नसली तरी ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे ही शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याअगोदरच कुटुंबातील सर्वाची परवानगी घेणे गरजेचे आहे.यानंतरच सारबारा उतारे वेगळे करता येतातकुटुंबातील सर्व सदस्यांची परवानगी आहे हे ठरल्यानंतरच विहित नमुन्यातील फॉर्म भरून द्यावा लागतो. त्यासोबत सातबारा उतारा, 8 अ. कुटुंबा सर्वांची ओळखपत्र, शेत जमिनीची कागदपत्रे जाडून तहसील कार्यालयात प्रस्ताव दाखल करावा लागतो. सदरचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर तो योग्यरीत्या तपासून तहसीलदार प्रत्येकाला नोटिशीद्वारे कळवून सुनावणीसाठी तारीख देतात. हे सुनावणीची प्रक्रिया पार पाडल्यानंतर तहसीलदार संबंधित तलाठी व मंडळ निरीक्षकांना आदेश देतात. त्याप्रमाणे नोंद करून ती मंजूर करून घ्यावी लागतात आणि नंतरच ठरल्याप्रमाणे सातबाराचे उतारे वेगळे होतात.
आवश्यक माहिती
हा फार्म एकूण दहा पाणी असतो. यामध्ये जमिनीचा तपशील, जमिनीचे क्षेत्र, घोषणा पत्र, तलाठ्याचा आदेश, सर्वांचे प्रतिज्ञापत्र, नोटिसा, जमीन वाटपासंबंधी तपशीलवार माहिती, अंतिम आदेश इत्यादी माहिती असतेखाते फोड करण्यासाठी आवश्यक माहितीखाते फोड करण्याचा एक दहा पानी फॉर्म असतो. त्यामध्ये जमिनीचा तपशील देणे अनिवार्य असते. जसे की, जमिनीचे एकूण क्षेत्र, घोषणा पत्र, तलाठ्याचा आदेशपत्र, कुटुंबातील सर्वांचे प्रतिज्ञापत्र अंतीम आदेश इत्यादी.













