लायन्स क्लब ऑफ कुडाळ – सिंधुदुर्ग आयोजित लायन्स फेस्टिवल

ऑटो एक्स्पो इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिवल २०२४

कुडाळ : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी व जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी लायन्स क्लब ऑफ कुडाळ – सिंधुदुर्ग यांच्या वतीने ३० व ३१ डिसेंबर २०२४ रोजी कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर लायन्स फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.

हे फेस्टिवल म्हणजे ऑटो एक्स्पो इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिवल असणार आहे. या दिवशी सुर नवा ध्यास नवा फेम अनुष्का शिकतोडे व धनश्री कोरगावकर, चित्रपट अभिनेत्री श्वेता परदेशी, अभिनेत्री व कोरीयोग्रफर मिनाक्षी पोशे, स्वरकोकण रत्न हर्षद मेस्त्री, इंडियन आयडॉल फेम गणेश मेस्त्री उपस्थित राहणार आहेत.

दिनांक ३० व ३१ डिसेंबर रोजी सायं. ६ वाजल्यानंतर हा कार्यक्रम असून सर्वांनी या फेस्टिवलचा लाभ घ्यावा असे आवाहन लायन्स क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!