इन्सुली : इन्सुली गावात रावे (RHWE) ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव, कार्यक्रमांतर्गत उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शाळा परिसर स्वच्छता मोहीम राबवली. या उपक्रमात इन्सुली जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
स्वच्छता मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांनी शाळेचा परिसर, वर्गखोल्यांभोवतीची जागा तसेच खेळाचे मैदान स्वच्छ केले. परिसरातील कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले तसेच स्वच्छ व निरोगी वातावरण राखण्याचा संदेश देण्यात आला.
या उपक्रमामुळे शाळेचा परिसर स्वच्छ आणि सुंदर झाला असून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण झाली. ग्रामस्थ व शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या कार्याचे अभिनंदन केले.
यामध्ये साहिल कोकरे, अथर्व गावकर, सुशांत जोशी, देवेन सावंत, रॏनक पंकज, जस्विन जैन, अभय पाटील या विद्यार्थ्यांच्या समावेश आहे.