रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात जितेंद्र आव्हाडांची पोलीसात तक्रार

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली. या घटनेवरुन सध्या राजकारण तापले आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध व्यक्त करण्यात येत आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी काल सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सहभाग घेतला होता. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप केले होते. सरपंच देशमुख हत्या प्रकरणी निघालेल्या मोर्चात जितेंद्र आव्हाड कुटुंबाला न्याय देण्यासाठी आले होते की आग लावण्यासाठी? सांगून टाका जितेंद्र भाऊ आव्हाड. उत्तर दया, असा सवाल रुपाली ठोंबरे यांनी विचारला होता. आता जितेंद्र आव्हाड यांनी याविरोधात रुपाली ठोंबरेंची पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी रुपाली ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रुपाली ठोंबरेंसह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आयटी अॅक्ट्नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे. यात त्यांनी रुपाली ठोंबरेंविरुद्ध निशाणा साधला आहे. तसेच रुपाली ठोंबरे यांनी शेअर केलेला स्क्रीनशॉट खोटा असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!