पनवेल : (राह) पनवेल येथील सायली कदम या १६ वर्षीय अपंग मुलीला आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून जीवनदान मिळाल्यामुळे ते या मुलीसाठी देवदूतच ठरले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, ही मुलगी अपंग असून तिच्या गॉलब्लेडरमध्ये तब्बल ९ स्टोनचे खडे होते. डॉक्टरांनी ताबडतोब शस्त्रक्रिया करण्यासाठी सांगितले होते. त्यासाठी तब्बल २ लाख ८० हजार रुपये खर्च येणार होता. ही बाब मुलीच्या वडिलांनी आ. निलेश राणे यांना फोन करून त्यांच्या कानावर घातली. आ. निलेश राणे विधिमंडळाच्या कामात व्यस्त असून देखील त्यांनी ताबडतोब याची दखल घेतली. “तुम्ही काही काळजी करू नका, पुढच्या १० मिनिटात माझ्या माणसांचा तुम्हाला कॉल येईल, तुमच्या मुलीची जबाबदारी पूर्णपणे आमची” असे आश्र्वासनच त्यांनी मुलीच्या वडिलांना दिले.
यानंतर पुढच्या १० मिनिटातच राणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. अवघ्या ३ दिवसातच मुंबईच्या पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये मुलीवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया पार पडली आणि त्या मुलीचे प्राण वाचले. कामात व्यस्त असताना देखील या मुलीला जीवनदान देऊन आ. निलेश राणे या मुलीसाठी एकप्रकारे देवदूतच ठरले. यावेळी मुलीच्या कुटुंबीयांनी आ. निलेश राणे यांचे मनापासून आभार मानले.
जेव्हा एखादा कोकणी माणूस संकटात असतो त्यावेळी राणे कुटुंब नेहमी अशा माणसांच्या मदतीला धाऊन जाते. हे आ. निलेश राणे यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले.