मुंबई : मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक मुंबई येथे पार पडली. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच कै. संतोष देशमुख यांची निर्घृण व अमानवी पद्धतीने झालेल्या हत्येचा निषेध यावेळी करण्यात आला.
या बैठकीसाठी मराठा समाजाचे सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीमध्ये खालील ठराव मांडण्यात आला.
मराठा क्रांती मोर्चा बैठकीतील ठराव :
१. कै. संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत धनंजय मुंडे यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी.
२. कै. संतोष देशमुख यांच्या हत्येमागे कट रचल्याप्रकरणी वाल्मिक कराड ला हत्येच्या गुन्ह्यात आरोपी करून फाशी देण्यात यावी तसेच धनंजय मुंडे यांच्या हस्तक्षेपामुळे सहआरोपी करावे.
३. कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना सहआरोपी करावे.
४. २८ डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.
५. कै. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना व मस्साजोग गावाला पोलीस संरक्षण देण्यात यावे.
६. कै. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना सर्व मराठा समाजाने आर्थिक मदत करावी.
७. बीड जिल्ह्यात वर्ग ३ व वर्ग ४ पदांवरील जागांची बिंदूनामवली प्रमाणे चौकशी करून सर्व समाजाला न्याय द्यावा.
८. वाल्मिक कराड यांच्या आर्थिक व्यवहार व संपत्तीची ED मार्फत चौकशी करावी.
९. धनंजय मुडे यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी होईपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस चे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार व धनंजय मुंडे यांचे सार्वजनिक कार्यक्रम मराठा क्रांती मोर्चा होवू देणार नाही.
१०. बीड जिल्ह्याचे पालकत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः कडे ठेवावे व कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करावी.
—
मराठा क्रांती मोर्चा च्या बैठकीसाठी अंकुश कदम, धनंजय जाधव, नरेंद्र पाटील, राजेंद्र कोंढरे, रघुनाथ चित्रे पाटील, करण गायकर, राजन घाग, किशोर चव्हाण, महेश डोंगरे, सुनील नागणे यांच्यासह सर्व जिल्ह्यातील मराठा बांधव उपस्थित होते.