गोळवण येथील उबाठाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

संतोष हिवाळेकर/ पोईप

मालवण : आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली मालवण तालुक्यात शिवसेनेचा झंझावात सुरूच आहे. तालुक्यातील गोळवण, कुमामे, डिकवल गावातील उबाठाचे विभागप्रमुख भाऊ चव्हाण, माजी सरपंच प्रज्ञा चव्हाण यांसह अनेक पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन शुक्रवारी रात्री शिवसेनेत पक्षप्रवेश केला. शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात शिवसेना जोमाने वाढत आहे. जिकडे बघावे तिकडे पक्षप्रवेश होत आहेत. मालवण कुडाळ मतदार संघातही दररोज शिवसेनेत पक्षप्रवेश होत आहेत. जनतेचा असलेला विश्वास सार्थ ठरवताना गावागावातील सर्व विकासकामे पुर्ण केली जातील. अधिकाधिक विकासनिधी मतदारसंघात आणला जाईल, अशी ग्वाही आ. निलेश राणे यांनी देऊन विकासकामे होत असताना ती दर्जेदार झालीच पाहिजे. कामात कोणतीही तडजोड होणार नाही. जे जनतेच्या हिताचे त्यालाच सर्वाधिक प्राधान्य असेल. ज्या धनुष्यबाण चिन्हावर राणे साहेबांची राजकीय सुरवात झाली त्याच धनुष्यबाण चिन्हावर माझी दुसरी इनिंग सुरु झाली आहे. आता यापुढील सगळी वर्षे जनतेसाठीच असतील, असे सांगितले.

गोळवण आमराई रीसॉर्ट येथे यावेळी आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, तालुकाप्रमुख राजा गावडे, तालुकाप्रमुख विनायक बाईत, मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर, जि. प. चे माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर, संतोष साटविलकर, माजी सभापती राजू प्रभुदेसाई, ग्रा. प. सदस्य साबाजी गावडे, गोळवण शाखाप्रमुख विकास परब, राजन माणगावकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, युवा उद्योजक सुशांत घाडीगांवकर, दादा नाईक, कमलेश प्रभू, देवली सरपंच शाम वाक्कर, महान सरपंच अक्षय तावडे, पोईप सरपंच श्रीधर नाईक, वेरळ उपसरपंच शामा चव्हाण, शामसुंदर चिरमुले, तुकाराम जाधव, मुरारी गावडे, प्रशांत परब, सुनील गावडे, मनीष जाधव, बाबुराव चिरमुले, विजय परब, नामदेव गावडे, दिवाकर परुळेकर, निवेदक सागर जाधव यांसह अन्य पदाधिकारी व गावातील जेष्ठ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सामूहिक पक्षप्रवेश केवळ राजकीय बदल नसून, ग्रामीण भागातील जनतेचा शिवसेनेवर असलेला विश्वास आणि निष्ठेचा ठोस पुरावा आहे. शिवसेना ही केवळ एक राजकीय संघटना नाही, तर सामान्य जनतेच्या हक्कासाठी लढणारी चळवळ आहे. या नव्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे गोळवण गावातील शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे, असे निलेश राणे म्हणाले.

आम्हाला राणे साहेबांची शिकवण आहे. जनतेचे प्रश्न तात्काळ सुटले पाहिजेत. त्या मार्गदर्शनात आम्ही काम करत असताना शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत जनतेची अनेक कामे स्वखर्चाने करतात. संघटना वाढवत आहेत. रोज पक्ष प्रवेश होत आहेत. उपनेते संजय आंग्रे यांचेही मार्गदर्शन साथ लाभत आहे. शिवसेना सर्व पदाधिकारी चांगले काम करतं आहेत. शिंदे साहेबांना अपेक्षित संघटन कार्य करत असताना सर्वांचे मोलाचे योगदान लाभत असल्याचे आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केले. मालवण कुडाळ मतदारसंघ अग्रेसर व्हावा हेच आपले लक्ष आहे. विधिमंडळ, मंत्रालय स्तरावरून जास्तीत जास्त निधी आणण्याचे प्रयत्न आहेत. त्यात यश मिळतं आहे. शिंदे साहेबांचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे मतदारसंघात जास्तीत जास्त निधी आणणार. एमआयडीसी मध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून सोई सुविधा सुरु आहेत. पुढील वर्षात जास्तीत जास्त रोजगार देण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.

यावेळी उबाठा विभागप्रमुख भाऊ चव्हाण यांसह गोळवण माजी सरपंच तथा शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रज्ञा चव्हाण, डिकवल शाखाप्रमुख भालचंद्र गावडे, शाखाप्रमुख एम. जी. गावडे, युवासेना शाखाप्रमुख निलेश गावडे, डिकवल बुथप्रमुख प्रशांत डिकवलकर, युवासेना उपशाखाप्रमुख दत्ताराम गावडे, माजी पोलीस पाटील मोहन पवार, गोळवण बुथप्रमुख कृष्णा चिरमुले, गटप्रमुख जगु चिरमुले, युवासेना उपशाखाप्रमुख प्रवीण चिरमुले, बुथप्रमुख नामदेव गावडे, गट प्रमुख ताता दाभोलकर, माजी शाखाप्रमुख एकनाथ चव्हाण, गटप्रमुख दिगंबर चिंबदरकर, कुमामे शाखाप्रमुख गणेश मुणगेकर, गटप्रमुख महादेव पवार, डिकवल युवासेना प्रमुख विराज राणे, चव्हाणवाडी गटप्रमुख रवींद्र चव्हाण, देवस्थान कमिटी गोळवण उपाध्यक्ष प्रल्हाद नाईक, गोळवण माजी उपशाखाप्रमुख प्रकाश नाईक, गटप्रमुख मयूर नाईक यांसह असंख्य उबाठा कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याबाबत माहिती भाऊ चव्हाण यांच्या वतीने देण्यात आली आहे.

आमदार निलेश राणे यांचे विकासकार्य अभिमान वाटावे असे आहे. त्यांच्या विकास कार्यावर सर्वत्र पक्षप्रवेशांचा धमाका सुरु आहे. विकासकामांचा प्रत्येक शब्द आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पुर्ण होत आहेत. विधानसभेत त्यांची भाषणे त्यांचे व्हिजन व अभ्यासूपणा स्पष्ट करतो. दहा वर्षात येथील माजी आमदाराने काहीच केले नाही. त्यामुळेच जनतेने त्यांना घरी बसवले आणि आपले हक्काचे आमदार निलेश राणे विजयी केले. आगामी काळात विकासाची गती अशीच कायम राहील. खासदार राणे साहेबांच्या मार्गदर्शनात आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून हा मतदारसंघ विकासकामात अव्वल ठरेल. असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला.

तर हा भाग राणे साहेबांचा बालेकिल्ला होता आणि पुढेही राहील. मालवण कुडाळ मतदारसंघात आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत धडाडीने काम करत आहेत. जनतेची गरज ओळखून तात्काळ विकासकामे होत आहेत. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून विकास कामांचा धडाका सुरु असल्याचे जि. प. माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदाळकर यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!