‘विज्ञानाचे सिद्धांत प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी तसेच वैज्ञानिक संकल्पना, विज्ञानाचे शिक्षण प्रभावीपणे आणि रंजक पद्धतीने घेण्यासाठी, विद्यार्थ्यांनी मिनी सायन्स लॅब चा उपयोग करावा व वैज्ञानिक प्रयोगाद्वारे आपले ज्ञान दृढ करावे’ असे विचार,कोकण रेल्वे रत्नागिरीचे रिजनल पर्सनल ऑफिसर श्री.महेश साखळकर साहेब यांनी मांडले. मागासवर्गीय एज्युकेशन सोसायटी संचलित प.पूज्य आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली- केरवडे,ता.कुडाळ या विद्यालयास CSR फंडातून दिलेल्या मिनी सायन्स लॅब तसेच विद्यार्थी व महिला पालक यांना दिलेल्या विविध साहित्य प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कोकण रेल्वे रत्नागिरीचे श्री. पंकज कांबळे ASTE कणकवली,श्री.रणजीत केसरी पर्सनल इन्स्पेक्टर, श्री. विकास सामंत एरिया सुपरवायझर कुडाळ,श्री. निलेश वाडकर कॉम्प्युटर ऑपरेटर,संस्थेचे उपाध्यक्ष श्री. अर्जुन परब, कार्याध्यक्ष श्री. वामन गावडे,सचिव श्री. अंकुश जाधव,खजिनदार श्री. देवदत्त चुबे सर, सहखजिनदार सौ.करिष्मा भोई,संचालक श्री. मोहन भोई,श्री. तातू मुळीक, श्री. निलेश सामंत, श्री.केशव पेडणेकर,मांडकुली सरपंचा सौ. गौतमी कासकर,केरवडे सरपंचा सौ. श्रीया ठाकूर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
दीपप्रज्वलन व सरस्वती प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुरेंद्र खोत सर यांनी सर्वांचे स्वागत करून शाळेची प्रगती व गुणवत्तापूर्ण निकाल याबद्दल आपले मत व्यक्त केले. यानंतर कोकण रेल्वे रत्नागिरीच्या CSR फंडातून दिलेल्या मिनी सायन्स लॅब चे उद्घाटन श्री. महेश साखळकर साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.तसेच विद्यालयास एक संगणक व प्रिंटर,गरजू विद्यार्थिनींना 10 सायकली,ग्रंथालयासाठी सुमारे 10000 रु. किमतीची पुस्तके, 50 गरजू महिला पालकांसाठी प्रत्येकी 1000 रु.चे गृहोपयोगी साहित्य व सर्व विद्यार्थिनीना आरोग्य विषयक किट्स चे वितरण रेल्वे अधिकारी, संस्था पदाधिकारी, संचालक व पालक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. नागवेकर हॉस्पिटल कणकवली च्या सुपरवायझर सिस्टरश्रीमती उबाळे मॅडम व श्रीमती ठाकूर मॅडम यांनी मुलींना आरोग्य विषयक मार्गदर्शन करून कोकण रेल्वेतर्फे दिलेल्या हायजेनिक किट्सचे वाटप केले.
संस्था व विद्यालयातील मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने श्री. महेश साखळकर यांचा सत्कार संस्था उपाध्यक्ष श्री.अर्जुन परब,श्री. पंकज कांबळे यांच्या सत्कार कार्याध्यक्ष श्री. वामन गावडे,श्री. रणजीत केसरी यांचा सत्कार सचिव श्री अंकुश जाधव, श्री. विकास सामंत यांचा सत्कार खजिनदार श्री.देवदत्त चुबे,श्री. निलेश वाडकर यांचा सत्कार मांडकुली सरपंच यांच्या हस्ते करण्यात आला. तर निधी देण्यामध्ये महत्त्वाचे योगदान देणारे रिजनल रेल्वे मॅनेजर श्री. शैलेश दामोदर बापट यांचा सत्कार केरवडे सरपंच सौ. श्रीया ठाकूर यांच्या हस्ते रेल्वे अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. ज्यांच्या प्रयत्नातून या निधीसाठी रेल्वे प्रशासनाकडून आर्थिक सहाय्य मिळाले ते श्री. विकास सामंत यांनीही विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.
पाहुण्यांची ओळख व परिचय विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री. गिरीश सरवटे सर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अनिल गोवेकर सर यांनी तर उपस्थित सर्वांचे आभार संस्था सचिव श्री. अंकुश जाधव यांनी मानले.