९ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती बंद

संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती 9 जानेवारी रोजी बंद पाळतील अशी माहिती अखिल भारतीय सरपंच परिषदेने दिली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सरपंच परिषदेने देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली.

अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने संतोष देशमुख यांच्या परिवाराची सांत्वनपर भेटल घेतली. महाराष्ट्रात प्रथमच एवढ्या अमानुष, अमानवीय पद्धतीनं ही हत्या झाली असून यामधील आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. राज्यात परत कोणाचीही अशी हिंमत होणार नाही अशा पद्धतीचे कडक शासन आरोपींना करावे अशी मागणी सरपंच परिषदेने केली.

संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायती 9 जानेवारी या दिवशी बंद राहतील अशी माहिती सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. राज्यभरातले सरपंच मस्साजोगमधील घटनेमुळे हादरले आहेत. समाजसेवा करणे पाप आहे का हा प्रश्न राज्यातल्या सरपंचांना पडला आहे. त्यामुळे यामध्ये सरपंच संघटना आक्रमकपणे भूमिका मांडत असून याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली.

error: Content is protected !!