मालवण तालुक्यातील नांदोस गावात आढळला मृतदेह

मालवण : तालुक्यातील नांदोस गावात जंगलमय भागात पुरुष जातीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आहे. मृतदेहाच्या काही भागाचे जंगली प्राण्यांनी लचके तोडले आहेत. त्यामुळे मृतदेहाची काही प्रमाणात वाताहात झालेली दिसून येत आहे. ही बातमी समजताच गावातील नागरिकांनी याबाबत मालवण पोलिसांना खबर दिली असून काही वेळात मालवण पोलीस घटनास्थळी दाखल होणार आहेत.

error: Content is protected !!