राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत पूजा वारीक, कोमल पाताडे व हेमंत पाटकर प्रथम

ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे आयोजन

वैभववाडी: २४ डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२४ मध्ये कनिष्ठ महाविद्यालय गटात कु.पूजा वारीक, महाविद्यालय गटात कु. कोमल पाताडे तर खुल्या गटात हेमंत पाटकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे.

२४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त सदर स्पर्धा ग्राहक साक्षरता उद्देशाने तीन गटात आयोजित करण्यात आली होती.या निबंध स्पर्धेत २५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचा गटनिहाय निकाल पुढीलप्रमाणे. कनिष्ठ महाविद्यालय गट- (विषय-ग्राहक म्हणून माझी अपेक्षा) प्रथम- कु. पूजा मनेष वारीक-(न.शां.पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय देवगड), द्वितीय- कु. रिध्दी जयेंद्र पाळेकर (कनिष्ठ महाविद्यालय कासार्डे), तृतीय- कु.अर्चिता चंद्रकांत दळवी (कनिष्ठ महाविद्यालय आचिर्णे). महाविद्यालय गट- (विषय-मॉल संस्कृती आणि ग्राहक) प्रथम- कु.कोमल शिवराम पाताडे (बी. फार्मसी कॉलेज सांगुळवाडी), व्दितीय- कु.अश्विनी संतोष पांचाळ (आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी), तृतीय- कु. दिपा दिनेश तेली (आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी)खुला गट- (विषय- चळवळीचे सामर्थ्य आणि ग्राहक) प्रथम- हेमंत मोतीराम पाटकर- कणकवली, द्वितीय- निता नितीन सावंत- सावंतवाडी, तृतीय- तेजश्री संजय पाटील- कासार्डे या विजयी स्पर्धकांना मंगळवार दि.२४ डिसेंबर रोजी सकाळी ठिक १०.३० वा. लतीफ बेग गार्डन हॉल कोलगांव ता.सावंतवाडी येथे आयोजित जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी सर्व विजयी स्पर्धकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *