कुडाळ : कुडाळ तालुक्यातील निसर्गाने नटलेल्या निरुखे गावाचा आज दिनांक २१ डिसेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव आहे.यावेळी रात्री दशावतारी नाटकाचे आयोजन केले आहे.बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग असून त्या आधी श्री देव रवळनाथाच्या पालखीचा दिमाखदार सोहळा होणार असून दुसऱ्या दिवशी माहेरवाशिणी श्री देव रवळनाथ चरणीओटी भरणार आहेत.तरी समस्त निरुखे ग्रामस्थ तसेच देवस्थान कमिटी निरुखे यांच्याकडून श्री देव रवळनाथ चरणी लीन होऊन जत्रोतस्वला सर्व भाविकांनी उपस्थित राहून त्यांच्या आशीर्वाद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.