कुडाळ शहरातील तीन व्हिडिओ गेमपार्लर वर आज सायंकाळी पोलिसांनी छापेमारी करून कारवाई केली. यामध्ये व्हिडिओ गेम पार्लरमधील यंत्रसामग्रीसह रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे.
दरम्यान कुडाळ शहरांमध्ये सुरू असलेल्या व्हिडिओ गेम पार्लरमध्ये पैसे देऊन सट्टा खेळला जातो अशी माहिती कुडाळ पोलिसांना मिळाल्यानंतर कुडा पोलिसांनी शहरातील तीन व्हिडिओ गेम पार्लर वर छापा टाकला यामध्ये व्हिडिओ गेम पार्लर मध्ये खेळत असताना काहीजण सट्टा लावून हा खेळ खेळत असल्याचे निदर्शनास आले यावर कुडाळ पोलिसांनी कारवाई केली आणि व्हिडिओ गेम पार्लर मधील मशीन तसेच खेळली जाणारी रोख रक्कम हस्तगत केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याबाबत उशिरापर्यंत कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.